शेळगाव पाटी येथून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:25+5:302021-06-05T04:15:25+5:30
ट्रकच्या धडकेत कार पलटी लातूर : भरधाव वेगातील एमएच २६ बीई २३११ या क्रमांकाच्या वाहनाने आडोळवाडी पाटी येथे समोरून ...

शेळगाव पाटी येथून दुचाकीची चोरी
ट्रकच्या धडकेत कार पलटी
लातूर : भरधाव वेगातील एमएच २६ बीई २३११ या क्रमांकाच्या वाहनाने आडोळवाडी पाटी येथे समोरून येणाऱ्या कारला उजव्या बाजूने कट मारला. यात कार पलटी झाली असून, कारमधील प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत नंदकुमार मारोतीराव पटुळे (रा. चिमाचीवाडी, ह.मु. शाहूनगर, चिंचवड पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर क्रमांकाच्या ट्रक चालकाविरुद्ध वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना येमले करीत आहेत.
पाईपलाईन परस्पर चालू केल्यावरून मारहाण
लातूर : तू पाईपलाईन परस्पर चालू का केलास म्हणून वेळूच्या काठीने पाईपलाईन फोडून एकाला मारहाण केल्याची घटना वाढवणा (खु.) शिवारात घडली. फिर्यादीला वेळूच्या काठीने मारून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असे वाढवणा पोलिसात गणपत ज्ञानोबा भंडारे (रा. वाढवणा खु.ता. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार तुकाराम पंढरीनाथ भंडारे व अन्य दोघांविरुद्ध वाढवणा पोलिसात गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोना येमले करीत आहेत.
ऑटोची एकाला धडक, गुन्हा दाखल
लातूर : रोडवरील बीएसएनएल कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगातील ऑटोने जोराची धडक दिली. या अपघातात गोविंद सखाहारी शिंदे (रा. रेणुकानगर, लातूर) हे गंभीर जखमी झाले. गुडघ्याखालचे हाड फ्रॅक्चर झाले असून, याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऑटोचा क्रमांक माहीत नसलेल्या चालकाविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.