गुळ मार्केट परिसरातून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:28+5:302021-02-10T04:19:28+5:30
दुचाकीची धडक; एकजण जखमी लातूर : रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगातील दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकजण जखमी झाल्याची ...

गुळ मार्केट परिसरातून दुचाकीची चोरी
दुचाकीची धडक; एकजण जखमी
लातूर : रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगातील दुचाकीने जोराची धडक दिल्याने एकजण जखमी झाल्याची घटना अंबाजोगाई ते रेणापूरकडे जाणाऱ्या रोडवरील समसापूर पाटीजवळ २९ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रभू मानाजी चव्हाण (रा. लिमगाव, ता. अंबाजोगाई) हे अंबाजोगाई ते रेणापूर जाणाऱ्या रोडवर समसापूर पाटीजवळ रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी (क्र. एमएच ४४ एफ ८६२५) ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून, डोक्यात व पाठीत मुका मार लागला आहे. प्रभू चव्हाण यांच्या तक्रारीवरून रेणापूर पोलिसात दुचाकी क्र. एमएच २४ एफ ८६२५ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. कांबळे करीत आहेत.