दोन दुचाकींची चोरी ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:26+5:302021-06-02T04:16:26+5:30
नळाचे पाणी भरण्यावरून मारहाण लातूर : घर वाटणी तसेच नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून उदगीर येथील गंगानगर येथे मारहाण झाल्याची ...

दोन दुचाकींची चोरी ; गुन्हा दाखल
नळाचे पाणी भरण्यावरून मारहाण
लातूर : घर वाटणी तसेच नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून उदगीर येथील गंगानगर येथे मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत संतोष रमेश यमलवार (रा. गंगानगर, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोविंद रमेश यमलवार व अन्य तिघांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : लातूर येथील इस्लामपुरा भागात मागील भांडणाची कुरापत काढून काठीने डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना घडली. याबाबत रफिक कलिम काझी (रा. इस्लामपुरा, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अन्सार रौनक अली सय्यद व अन्य तिघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. रंगवाळ करीत आहेत.
तु आमच्या वस्तीत का आलास म्हणून मारहाण
लातूर : गावातील नालेसफाईचे काम चालू असल्याने पाहत उभे असताना एकाला तु आमच्या वस्तीत इथे का आलास म्हणून शिवीगाळ करून मारहाण झाल्याची घटना बाभळगाव येथे घडली. याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काठीने उजव्या हाताच्या दंडावर मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. डाव्या हाताच्या मनगटावर ही मारून जखमी केले, असे श्रीराम शिवाजी मस्के (रा. बाभळगाव) यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार लक्ष्मण सुरेश ईटकर (रा. बाभळगाव) व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोना. जहागीरदार करीत आहेत.