गाडीमध्ये ठेवलेल्या मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:11+5:302021-05-01T04:18:11+5:30
आंबे काढण्यावरून एकास मारहाण लातूर : पोमादेवी जवळगा येथील शिवारात झाडाचे आंबे काढण्यावरून एकास मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत ...

गाडीमध्ये ठेवलेल्या मोबाईलची चोरी
आंबे काढण्यावरून एकास मारहाण
लातूर : पोमादेवी जवळगा येथील शिवारात झाडाचे आंबे काढण्यावरून एकास मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत सुरेश बाबू मंगरुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर काशीनाथ मंगरुळे यांच्याविरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. उस्तुर्गे करीत आहेत.
गुटख्याची चोरटी विक्री; गुन्हा दाखल
लातूर : गुटख्याची चोरटी विक्री केल्याप्रकरणी किनगाव येथे एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. व्यंकट काकाजी महाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शकील सरदारखाँ पठाण (रा. किनगाव) याच्याविरुद्ध कलम १८८, २६९, २७२, २७३, २२८ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनासपुरे करीत आहेत.
चाकूर ते लातूर रोड रस्त्यावर मोबाईलची चोरी
लातूर : चाकूर ते लातूर रोडकडे येणाऱ्या रस्त्यावर गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून नाष्टा करण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत रसूल इमान सय्यद (रा. खाटिक गल्ली, औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.