मॉलमधून कॉपर पाईपची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:00+5:302021-07-14T04:23:00+5:30
अतिक्रमण करून रस्त्याचे नुकसान लातूर : आठ फुटांचा रस्ता खरेदी केलेला त्यामध्ये अतिक्रमण करून रस्ता उकरून नुकसान केल्याची घटना ...

मॉलमधून कॉपर पाईपची चोरी
अतिक्रमण करून रस्त्याचे नुकसान
लातूर : आठ फुटांचा रस्ता खरेदी केलेला त्यामध्ये अतिक्रमण करून रस्ता उकरून नुकसान केल्याची घटना चिंचोली बल्लाळनाथ शिवारात घडली. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी रामकिशन गुंडिबा सुरवसे (४६, रा. मांजरी, ता. लातूर) यांनी चिंचोली शिवारात गट नं. १९४ मधील आठ फुटांचा रस्ता खरेदी केलेला असून, त्यामध्ये तौफिक सिकंदर शेख याने अनधिकृतरित्या अतिक्रमण करून हा रस्ता उकरून काढून नुकसान केले. शिवाय, पेरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चिंचोली शिवारात घडली. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
बांधावरील झाड तोडले; पाच जणांवर गुन्हा
लातूर : सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना १० जुलै रोजी भंडारवाडी येथे घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश बाबुराव गुणाले (५०, रा. भंडारवाडी, ता. रेणापूर) यांच्यासह मुलगा, भाऊ यांना सामाईक बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून अंगद सूर्यकांत गुणाले याच्यासह अन्य पाच जणांनी संगनमत करून लोखंडी गजाने मारहाण केली. शिवाय, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाहनांच्या बॅटऱ्यांची चोरी; गुन्हा नोंद
लातूर : वाहनांच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना औसा येथे घडली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सुजित मिस्त्रीलाल सुराणा (४८, रा. मुरुड, ता. लातूर) यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी लावलेल्या पाच वाहनांतील एकूण दहा बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना ९ ते १० जुलै दरम्यान घडली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भरधाव बसची कारला धडक; वाहनांचे नुकसान
लातूर : नांदेड आगाराच्या भरधाव बसने एका कारला जोराची धडक दिली. हा अपघात अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात सोमवारी घडला. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नंदकिशोर शंकरलाल राठी (३८, रा. रवि नगर कवठा, नांदेड) हे आपल्या ताब्यातील कारने (एमएच २६ एके ३३८३) प्रवास करीत होते. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव आगाराच्या बस चालकाने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील नातेवाईक किरकोळ जखमी झाले. शिवाय, कारचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर परिसरातून दुचाकी पळविली
लातूर : उदगीर शहर परिसरातून दुचाकी पळविल्याची घटना २६ जून रोजी घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी बालाजी व्यंकटराव टवटेवाड (४२, हनुमान नगर, उदगीर) यांच्या ताब्यातील दुचाकी (एम. एच. २४, एसी ७०५९) अज्ञात चोरट्यांनी पळविली. ही घटना २६ जून रोजी घडली आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मोबाईल पळविला; अज्ञातावर गुन्हा
लातूर : मॉर्निंग वॉकवरून भाजीपाला खरेदी करून घराकडे निघालेल्या एकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी सकाळी राजीव गांधी चौक परिसरात घडली. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सुधाकर मारोतीराव गुरमे (६१, रा. ज्ञानेश्वर नगर, लातूर) हे सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान, भाजीपाला खरेदी करून ते घराकडे पायी निघाले होते. यावेळी त्यांच्या खिशातील १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञाताने पळविला. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतीच्या कारणावरून दोघांना जबर मारहाण
लातूर : शेतातील वळण रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून फिर्यादीसह आईला मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी रायवाडी शिवारात घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी गुणवंत पवार (१९, रा. रायवाडी, ता. लातूर) यांच्यासह आईला शेतातील वळण रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून शुभम दत्ता पवार याच्यासह अन्य चार जणांनी संगनमत करून जबर मारहाण केली. यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे. शिवाय, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निलंगा शहरातून दुचाकी पळविली
लातूर : निलंगा शहरातील दापका वेस परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी पळविल्याची घटना ८ ते ९ जुलै दरम्यान घडली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीहरी रामराव बंडे (४०, रा. दापका वेस, निलंगा) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी( एम. एच. २४, पीएफ ४५९८) घरासमोर थांबविली होती. दरम्यान, ती ८ ते ९ जुलैच्या रात्री कळविली. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.