पुलावर दुचाकी आडवी लावून ट्रक चालकास लुटले

By हरी मोकाशे | Updated: September 17, 2022 18:41 IST2022-09-17T18:41:22+5:302022-09-17T18:41:46+5:30

ट्रकमध्ये चढून चालकास मारहाण करीत लुटले

The truck driver was robbed by lying the bike horizontally on the bridge | पुलावर दुचाकी आडवी लावून ट्रक चालकास लुटले

पुलावर दुचाकी आडवी लावून ट्रक चालकास लुटले

किनगाव (जि. लातूर) : अहमदपूरहून परळीकडे जाणाऱ्या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून चालकास मारहाण करीत शस्त्राचा धाक दाखवून ३१ हजार ३०० रुपयांना लुटल्याची घटना कोपरा (किनगाव) गावाजवळील जुन्या पुलावर घडली. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूरहून परळीकडे एमएच ४४, यू ६१११ क्रमांकाचा ट्रक गुरुवारी रात्री निघाला होता. तो कोपरा गावाजवळील जुन्या पुलावर आला असता पाठीमागून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोघे ट्रकसमोर आले. त्यांनी दुचाकी आडवी लावली. त्यामुळे ट्रकचालकाने वाहन थांबविले. तेव्हा ते दोघे ट्रकमध्ये चढून चालकास मारहाण करीत शस्त्राचा धाक दाखवून चालकास खाली उतरविले. शिवीगाळ करीत मारहाण करुन खिशातील ३१ हजार ३०० रुपये पळविले. त्यानंतर मोटारसायकलवर दोघेही किनगावच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी ट्रकचालक नामदेव काकडे (रा. पोहनेर, ता. परळी) यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांत दोघा अज्ञात चोरट्यांविरोध विविध कलमान्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The truck driver was robbed by lying the bike horizontally on the bridge