शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नदी जिवंत झाली अन् शेती हिरवीगार झाली, मंगला पांडगे यांचा नैसर्गिक शेतीचा आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:23 IST

श्री श्री रविशंकर यांचा ‘नद्यांचे पुनरुज्जीवन’ प्रकल्प

लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा हे गाव. जिथे कधीकाळी बोअरवेल आटल्या होत्या. टँकरच्या पाण्यासाठी रांगा लागत. तिथे मंगला पांडगे या  नावाने आदर्श उभा केला. जिवंत झालेली नदी शेतकऱ्याच्या आयुष्यात काय बदल घडवू शकते, याचे त्या उदाहरण ठरल्या. मंगला यांच्या दहा एकर शेतीत शेवगा, संत्री, सीताफळ आणि बाजरीचे पीक होते. पावसाने दगा दिला तरी या पिकांतून त्या लाखोंचे उत्पन्न घेतात. जेथे फक्त एकदाच पीक घेता येत होते तेथे आज वर्षभर हिरवीगार शेती दिसते. मांजरा नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे हा बदल पहायला मिळत आहे. 

पूर्वी फक्त पावसाळ्यातच शेती, आता दोन्ही हंगामांत 

नदी पुनरुज्जीवनाच्या कामानंतर नदीलगतच्या गावांमधील टंचाईमुक्त स्थितीबाबत मंगला सांगतात, “आमचे गाव नदीपासून १० ते १५ किलोमीटर लांब, तरी आज येथे पुरेसे पाणी आहे. पूर्वी फक्त पावसाळ्यातच शेती करता येत होती. आता दोन हंगामात पीक घेतो. नदीत वर्षभर पाणी साठतंय, भूगर्भजल वाढलंय आणि लोकांनी डेअरी, तेल घाण्या, गिरण्या सुरू केल्या आहेत. जिथं पाणी आहे, तिथं भविष्य आहे.” मंगला यांना एका हंगामात फक्त शेवगा विकून साडेतीन लाखांहून अधिक नफा मिळाला. त्यांच्या शेतातील संत्री दर्जेदार असल्यामुळे आधीच बुकिंग होते.   

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ७२ हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन

मानवतावादी आणि आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दूरदृष्टीतून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून देशभरातील ७२हून अधिक नद्या व उपनद्यांचे पुनरुज्जीवन झाले आहे. ज्याचा लाभ २० हजारांहून अधिक खेड्यांत, साडेतीन कोटी लोकांना झाला आहे, असे म्हणतात, “जेव्हा नदीचे पुनरुज्जीवन होते, तेव्हा जीवनाचे पुनरुज्जीवन होते. पाणी शेतकऱ्याला प्रतिष्ठा देते, गावाला स्थैर्य देते आणि पुढच्या पिढीला आशा देते.”

मोहिमेचा गाभा  : मोहिमेचा गाभा म्हणजे वॉटरशेड व्यवस्थापन. डोंगरकड्यापासून खोरीपर्यंत पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीत मुरावा यासाठी केलेले नियोजन. साध्या भाषेत, पाणी जिथे पडते तिथेच रोखून भूजल वाढविणे. आता गाळ काढलेल्या नदीत वर्षभर पाणी साठते, यामुळे विहिरी व बोअरवेल पुन्हा भरल्या. 

१८ किमी मांजरा नदीपात्रातील गाळ व अडथळे हटविले 

२०१६ च्या सलग दुष्काळानंतर लातूर कोलमडण्याच्या स्थितीत असताना गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंगने जिल्हा प्रशासन, नागरिक आणि सीएसआर भागीदारांसह मांजरा नदीचे पुनरुज्जीवन सुरू केले.१८ किमी नदीपात्रातील गाळ व अडथळे हटविण्यात आले, गावागावांतूननिधी उभारला गेला आणि स्वयंसेवक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले. 

व्यापक चळवळीचा लाभ

महाराष्ट्रातील या व्यापक चळवळीअंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंगने २०१३ पासून २७ जिल्ह्यांतील ३३ नद्या, नाले आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले. ५७ हजारांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या, जवळपास २.९ कोटी घनमीटर गाळ काढला, ९४१ चौ.कि.मी. क्षेत्रावर याचा परिणाम झाला. ७.२ लाख झाडे लावली गेली. या प्रयत्नांचा लाभ २० लाखांपेक्षा अधिक लोकांना झाला.

‘नदी म्हणजे प्राणवाहिनी’    आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पर्यावरण प्रकल्प संचालक महादेव गोमरे सांगतात, “नदी म्हणजे शरीराचे प्राणवाहिनी तंत्र, पाणी फक्त वाहून गेल्यास ते नष्ट होते. पण जेव्हा ते जमिनीत मुरते आणि पुन्हा नदीला मिळते, तेव्हा पूर्ण जलस्तर महिनोमहिने जिवंत राहतो.” आर्ट ऑफ लिव्हिंगने शेतकऱ्यांना उसापासून दूर जाऊन विविध पिके आणि शेतीसोबत झाडे लावण्याचा सल्ला दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : River Revived, Farm Flourished: Mangala Pandge's Natural Farming Success Story

Web Summary : Mangala Pandge transformed arid land into a flourishing farm by reviving the Manjra River. This enabled year-round cultivation, boosting income with crops like drumsticks and oranges. Art of Living's river rejuvenation project benefited thousands of villages, proving water ensures stability and prosperity.
टॅग्स :riverनदीMaharashtraमहाराष्ट्र