'जागा आमची आहे, रिकामी कर'; संपत्तीच्या वादातून वृध्दास जीवे मारण्याचा प्रयत्न
By हरी मोकाशे | Updated: September 29, 2022 18:19 IST2022-09-29T18:19:19+5:302022-09-29T18:19:37+5:30
नाईक चौक भागातील जागेत असलेल्या शेडवरून वाद

'जागा आमची आहे, रिकामी कर'; संपत्तीच्या वादातून वृध्दास जीवे मारण्याचा प्रयत्न
उदगीर (जि. लातूर) : शहरातील नाईक चौकात जागेच्या वादातून एका ७२ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी हाश्मी सय्यदी मोहसीन (रा. सादतनगर, देगलूर रोड, उदगीर) यांचे नाईक चौक भागातील जागेत असलेले शेड खाली करू न देता, ही जागा आमची आहे, या कारणावरून आरोपी सलीम मुस्तफा हाश्मी याने जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबला. दरम्यान, आरोपी हाजी मुस्तफा हाश्मी, आरिफ सलीम हाश्मी, अजहर सलीम हाश्मी, वाहब हाजी हाश्मी, वसीम हाजी हाश्मी, नेहा सलीम हाश्मी, जुलेखाँ सलीम हाश्मी यांनी फिर्यादीचे नातेवाईक भांडण सोडविण्यासाठी आले असताना त्यांना लाथा- बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली.
या घटनेत फिर्यादी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून वरील आरोपींविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भोळ हे करीत आहेत.