वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी
By संदीप शिंदे | Updated: April 18, 2023 17:02 IST2023-04-18T17:01:52+5:302023-04-18T17:02:19+5:30
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील चारजण कारने किनगावहून मुखेडकडे जात होते.

वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघेजण गंभीर जखमी
किनगाव : अहमदपूर तालुक्यातील किनगावनजिक सोमवारी रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील चारजण कारने सोमवारी रात्री किनगावहून मुखेडकडे जात होते. किनगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील वळण रस्त्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. या अपघातात राजेंद्र रमेश विरपक्ष रा. मोररगा ता. मुखेड, विश्वंभर गंगाधर गोरे रा. तकबीड ता. नायगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. तर गजानन रमेश विरपक्ष व कार चालक मल्लिकार्जुन मदलापूरे रा.नायगाव हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर असलेल्या दोघांना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात कोणतीही नाेंद झालेली नाही.