शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

प्रचार अंतिम टप्प्यात; लातूर जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढतींनी लक्ष वेधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:35 IST

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी प्रत्येक मतदारसंघातील निवडणुकीचे मैदान गाजत आहे.

लातूर : प्रचार अंतिम टप्प्यात असून, चार दिवसांचा राजकीय खेळ प्रत्येक मतदारसंघात रंजक होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सरळ वाटणाऱ्या काही लढती चुरशीच्या होत असून, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अखेरपर्यंत रस्सीखेच चालणार आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांनी प्रत्येक मतदारसंघातील निवडणुकीचे मैदान गाजत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील दुरंगी लढत तिरंगी होताना दिसत आहे. राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आ. बाबासाहेब पाटील आणि महाविकास आघाडी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्यातील लढतीत तिसरे उमेदवार गणेश हाके स्पर्धेत दिसत आहेत. ते जनसुराज्य शक्ती पक्षाकडून उभे असून, भाजपचे प्रवक्ते होते. या तिरंगी सामन्यात महायुतीचे आ. बाबासाहेब पाटील सर्वसमाज घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

उदगीरमध्ये सामना राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी होत असून, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर भाजप सोडून तुतारी हाती घेतलेले माजी आ. सुधाकर भालेराव लढत देत आहेत. विकासकामांचा आलेख मंत्री बनसोडे यांची जमेची बाजू आहे. त्याचवेळी दोनवेळा आमदार राहिलेले भालेराव त्यांच्या कामाचा पाढा वाचून दाखवीत आहेत. इथे शरद पवार यांची सभा झाली. परंतु, त्यांनी बनसोडे यांच्यावर कोणतेही भाष्य केले नाही, याची चर्चा होताना दिसते.निलंग्यामध्ये माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान आहे. काँग्रेसचे अभय साळुंके यांची भाषणे चर्चेत आहेत. मात्र, मंत्रिपद आणि निलंग्याचे नेतृत्व हा मुद्दा महायुती पटवून देत आहे.

औशामध्ये भाजपचे आ. अभिमन्यू पवार विरुद्ध शिवसेनेचे माजी आ. दिनकर माने यांच्यातील सामना रंगतदार होत असून, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत औश्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सर्वाधिक दिसत आहेत. आ. पवार यांनी विकासकामांची यादी वाचून दाखवीत विरोधकांना तुमचे एक काम सांगा, असे खुले आव्हान दिले आहे.

लातूर शहरात काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख आणि भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, तर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आ. धीरज देशमुख विरुद्ध भाजपचे आ. रमेश कराड यांच्यातील लढत अंतिम टप्प्यातही चर्चेत आहे. दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांचे जाळे आणि कामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मतदार पुढे जाताना दिसत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlatur-city-acलातूर शहरlatur-rural-acलातूर ग्रामीणnilanga-acनिलंगाahmadpur-acअहमदपूरausa-acऔसा