शाखा व्यवस्थापकानेच केला सात लाखाच्या रकमेचा, साहित्याचा अपहार
By राजकुमार जोंधळे | Updated: July 8, 2023 19:52 IST2023-07-08T19:51:38+5:302023-07-08T19:52:43+5:30
लातुरातील घटना : पुणे येथील मुख्य शाखेची फसवणूक

शाखा व्यवस्थापकानेच केला सात लाखाच्या रकमेचा, साहित्याचा अपहार
लातूर : पुणे येथील एका माेबाईल कंपनीचे लातूर येथे असलेल्या शाखेतील विविध साहित्य आणि राेख रक्कम असा एकूण सात लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात लातूर शाखा व्यवस्थापकाविराेधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले, पुणे येथील एका कंपनीचे इलेक्ट्राॅनिक्स साहित्याचे लातूर शहरातील औसा राेडवर माेबाईल, इलेट्राॅनिक्सचे दुकान आहे. या शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले प्रसाद सुनील कुलकर्णी (वय २५, रा. जुना औसा राेड परिसर, लातूर) याने माेबाईल कंपनीचे वेगवेगळे साहित्य (किंमत ५ लाख ३६ हजार ३७८ रुपये) आणि राेख १ लाख ६४ हइजार ४१० रुपये असा एकूण ७ लाख ७९७ रुपयांचा अपहार केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पुणे येथील कपंनीत कार्यरत असलेले लेखा परिक्षक जयेशकुमार नायक (रा. पुणे) यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.