२ हजार ३०३ व्यक्तींच्या चाचण्यांत आढळले १८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:46+5:302021-07-08T04:14:46+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ८३४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ९ रुग्ण आढळले असून १४६९ ...

२ हजार ३०३ व्यक्तींच्या चाचण्यांत आढळले १८ रुग्ण
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ८३४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ९ रुग्ण आढळले असून १४६९ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात हे रुग्ण बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून अठरा नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या एकूण १५६ रुग्णांपैकी फक्त एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. तर नऊ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ४६ मध्यम लक्षणाचे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असून ३० रुग्ण मध्यम, परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. ७० रुग्ण सौम्य लक्षणाचे असून ३५ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.
जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी सहाशे दहा दिवसांवर गेला आहे. यामुळेच जिल्ह्याला दिलासा आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र २.६ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण गेल्या महिन्याभरापासून कमी झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील आठशेच्यावर गावे कोरोनामुक्त झाली आहेत.