जिल्ह्यात १ हजार ९४५ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये ३५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:29+5:302021-01-21T04:18:29+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ९३२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

जिल्ह्यात १ हजार ९४५ व्यक्तींच्या चाचण्यांमध्ये ३५ पॉझिटिव्ह
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ९३२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर १,०१३ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ३० पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रयोगशाळेतील चाचणीत ५ आणि रॅपिड टेस्टमध्ये ३०, असे एकूण ३५ नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख यांनी दिली.
सद्य:स्थितीत रुग्णालयांमध्ये ४१८ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, बुधवारी ५२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ४, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ४, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ९, शासकीय निवासी शाळा औसा येथील ७ आणि होम आसोलेशनमधील २१, अशा ५२ जणांना सुटी देण्यात आली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के
जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ६२८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३६ टक्के असून, रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी ४७३ दिवसांवर गेला आहे, तर मृत्यूचे प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून २.९ टक्के आहे.