शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; जखमी पाेलिस अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: October 9, 2023 19:38 IST

लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळफाटा येथे झाला होता अपघात

रेणापूर (जि. लातूर) : लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील पिंपळफाटा येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण अपघातात जखमी झालेले राज्य राखीव पोलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक लक्ष्मण शिवराम खरात यांचे एका खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान शनिवारी निधन झाले. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात घटनेची अद्यापही नाेंद झाली नव्हती.

लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळफाटा येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लातूरकडून येणाऱ्या ट्रॅक्टर आणि अंबाजोगाईच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये (एम.एच. २४ ए.डब्ल्यू ५९७७) क्रमांकाच्या कारचे मोठे नुकसान झाले, तर ट्रॅक्टरचे बोनट कारमध्ये घुसल्याने यात कारचालक लक्ष्मण शिवराम खरात (वय ३९, रा. शेंडगा, ता. गंगाखेड, ह.मु. लातूर) हे जखमी झाले होते. त्यांना रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा दाखल केले. मात्र, शनिवारी संध्याकाळी डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.

एक महिन्यापूर्वीच धुळ्याला झाली होती बदली...मयत लक्ष्मण खरात हे लातूर बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयात पाेलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत हाेते. त्यांची धुळे येथे एक महिन्यापूर्वीच राज्य राखीव पोलिस दलात बदली झाली होती. शुक्रवारी ते धुळ्यावरून लातूरकडे कुटुंबीयांना भेटण्यासाठी येत होते.

शेंडगा गावात झाले अंत्यसंस्कार...शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेणापूर-पिंपळफाटा येथे कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शेंडगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू