ढाब्यावरील ओली पार्टीच्या चौकशीचे तहसीलदारांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:17+5:302021-05-01T04:18:17+5:30

चाकूर नगर पंचायतीमधील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, दिवाबत्ती कर्मचारी, लिपिक, स्वच्छता व घनकचऱ्यावरील नियंत्रण प्रमुख या चौघांनी शहरानजीकच्या ...

Tehsildar ordered to investigate Oli party on Dhaba | ढाब्यावरील ओली पार्टीच्या चौकशीचे तहसीलदारांना आदेश

ढाब्यावरील ओली पार्टीच्या चौकशीचे तहसीलदारांना आदेश

चाकूर नगर पंचायतीमधील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, दिवाबत्ती कर्मचारी, लिपिक, स्वच्छता व घनकचऱ्यावरील नियंत्रण प्रमुख या चौघांनी शहरानजीकच्या एका धाब्यावर बुधवारी दुपारी ओली पार्टी केली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालीद हरणमारे यांनी त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, तहसीलदारांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना चौकशी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी सदरील चौघांना नोटिसा बजावल्या होत्या. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी चाकूरच्या तहसीलदारांना या प्रकरणाची आपण तात्काळ चौकशी करावी. चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत. तसेच नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी तहसीलदारांना सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

Web Title: Tehsildar ordered to investigate Oli party on Dhaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.