शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारे शेवटचं पत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 16:30 IST

मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. आता...

लातूर : मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. त्यामुळे निराश झालेल्या लातूर जिल्ह्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट ह्रदय पिळवून टाकणारी आहे.

लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील हे निवळी येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. एक मुलगी एमएसस्सी तर दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुलगाही पदवीधर असून, तो सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्यांना दहा एकर शेती असून त्यावर राष्ट्रीयकृत बँक आणि सहाकारी बँकेचे 3 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आरक्षण नसल्याने मुलांनाही नोकरी मिळत नसल्याचे कारण मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाटील यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नैराश्यातून आत्महत्यामुलाला चांगले शिक्षण दिले. शिक्षणावर मोठा खर्च करुनही नोकरी मिळत नाही. तसेच मराठा आरक्षणबद्दल सरकार चालढकल करत असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. यातूनच त्यांच्यात नैराश्य आले होते. मुलाचे काय होणार? ही चिंता त्यांना सतावत होती. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

पत्नीला पेन्शन मंजूर करावीकुठलीही संधी न मिळाल्याने उच्चशिक्षित मुले घरीच आहेत. माझ्या पगारावर घरप्रपंचही चालत नाही. त्यामुळे खासगी कर्ज काढण्याची वेळ माझ्यावर आली आणि त्यातून मी कर्जबाजारी झालो. माझ्या पश्चात प्रपंचासाठी पत्नीला लवकर पेन्शन मंजूर करावी असेही रमेश पाटील यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्या