शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पद्धतीचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:41+5:302021-09-10T04:26:41+5:30

येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात बुधवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सोपानराव क्षीरसागर होते. ...

Teachers should use a student-centered approach | शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पद्धतीचा वापर करावा

शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पद्धतीचा वापर करावा

येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात बुधवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सोपानराव क्षीरसागर होते. यावेळी संस्थेचे सचिव प्रभाकरराव कुलकर्णी, सूर्यकांत येरोळकर, भारतराव कोंडेकर, बाबुराव पेठे, प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, भालचंद्र कुकाले, संजय पांचाळ, रवी कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल म्हणाले, शिक्षकांनी शाळेत नवोपक्रम राबविले पाहिजेत. विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पद्धतीचा वापर करून बाला उपक्रम राबविले तर निश्चितच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होईल. यावेळी प्रभाकरराव कुलकर्णी, सोपानराव क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिवाजीराव मादलापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन विजय नाबदे, हनुमंत भोसले यांनी केले. किशोर कुलकर्णी यांनी आभार मानले.

मियावाकी वृक्ष लागवडीची पाहणी...

अनंतपाळ नूतन विद्यालयात ३५६ विविध वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, त्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी केली. विद्यालयाचा परिसर, शालेय इमारत पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अनंतपाळ नूतन विद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते बाटमपाम वृक्षाची लागवड करण्यात आली.

Web Title: Teachers should use a student-centered approach