गावातील ग्रामपंचायतीचे मतदान करून पुणे येथे परताना शिक्षकांचा जागीच मुत्यू, बीड नगर राज्य महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 15:58 IST2022-12-18T15:56:37+5:302022-12-18T15:58:18+5:30
गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावुन पुणे येथे निघालेल्या एकाचा चारचाकीचा बीड नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथे समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली

गावातील ग्रामपंचायतीचे मतदान करून पुणे येथे परताना शिक्षकांचा जागीच मुत्यू, बीड नगर राज्य महामार्गावरील घटना
नितीन कांबळे
गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावुन पुणे येथे निघालेल्या एकाचा चारचाकीचा बीड नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथे समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली असुन अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. किरण रामराव शिंगडे वय ५० वर्ष असे अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. ते चाकण येथील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर सहशिक्षक आहेत.
लातुर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील अंधुरी येथील किरण रामराव शिंगडे हे गावाकडे दोन तीन दिवसापुर्वी लग्नासाठी आले होते. लग्न झाल्यानंतर पत्नी पुण्याला गेली तर किरण हे मतदानासाठी गावीच थांबले होते, रविवारी मतदान करून ते पुण्याला मारूती सुझुकी एम.एच १४, डी.टी.४६ ५७ मधुन एकटेच चालले होते.तर पुण्यावरून पाटोदा तालुक्यातील डोमरी गावाकडे ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानासांठी एर्टीका क्रमांक एम.एच १४, एस.डी.८४१९ ने जात असताना बीड नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथे दोनही वाहनाचा समोरासमोर झालेल्या अपघातात किरण रामराव शिंगडे यांचा जागीच मुत्यु तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मयतावर धामणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.तर जखमीना बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.