शिक्षक, कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:56+5:302021-07-30T04:20:56+5:30

१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे. अशा शिक्षकांचे त्यांच्या वेतनातून ...

Teachers and staff protested with black ribbons | शिक्षक, कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध

शिक्षक, कर्मचाऱ्यांनी केला काळ्या फिती लावून निषेध

१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे. अशा शिक्षकांचे त्यांच्या वेतनातून मासिक १० टक्के वेतन कपात केले जाते. मात्र, १५ वर्षांपासून या शिक्षकांच्या कपात झालेल्या रकमेचा हिशोब देण्यात आला नाही. तसेच ७ व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता जून २०१९ मध्ये देणे अपेक्षित होते. तो अद्यापही डीसीपीएसधारक शिक्षकांना देण्यात आला नाही. त्यामुळे दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले जात आहे.

प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्यास आणखी आंदोलन करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी सांगितले. आंदोलनात तालुक्यातील यशवंत विद्यालयातील श्रीधर लोहारे, गुराप्पा बावगे, महादेव खळुरे, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. राहुल देशमुख, राजकुमार पाटील, अजित लंजिले, शरद करकनाळे, गौरव चवंडा, हनुमंत सुडे, मुक्राम सय्यद, सांगवे, मुकनर, मालवदे, धनुरे, सूर्यवंशी, सोमनाथ स्वामी, नागमणी हाळे, प्रतिभा सोलपुरे, देशमुख, वर्षा लगडे, मिरजगावे यांच्यासह मुख्याध्यापक व्ही. व्ही. गंपले, उपमुख्याध्यापक कोंडलवाडे, पर्यवेक्षक नरडिले, गुळवे आदींनी सहभाग नोंदविला.

Web Title: Teachers and staff protested with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.