महाविहार सातकर्णी नगर येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:22+5:302021-05-27T04:21:22+5:30

यावेळी धम्मदेसना देताना भन्ते पय्यानंद म्हणाले, सध्या जगामध्ये कोविडच्या महामारीमूळे संपूर्ण मानवजात ही भीतीदायक आणि निराशाजनक परिस्थितीमध्ये आपले जीवन ...

Tathagata Gautam Buddha Jayanti celebration at Mahavihar Satkarni Nagar | महाविहार सातकर्णी नगर येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी

महाविहार सातकर्णी नगर येथे तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी

यावेळी धम्मदेसना देताना भन्ते पय्यानंद म्हणाले, सध्या जगामध्ये कोविडच्या महामारीमूळे संपूर्ण मानवजात ही भीतीदायक आणि निराशाजनक परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहे. त्यामुळे संपूर्ण मानवी जीवनच विस्कळीत झालेले आहे. अशा या जागतिक महामारीमधून आपण लवकरच बाहेर येऊ आणि एक निरोगी व समृद्ध जीवन जगू अशी कामना आहे. याप्रसंगी सबका मंगल हो हा सामूहिक बुध्द मैत्रीपाठ आपल्या मंगलमय वाणीतून भंन्ते पय्यानंद यांनी व्यक्त केला. महामानव तथागत बुध्दांच्या जन्मामूळे ही त्रीगुणी पौर्णिमा पावन झाली आहे. आज महामानव तथागत भगवान बुद्धांचा जन्म होणे ही या सृष्टीसाठी अत्यंत मंगलकारक घटना असून, तथागतांच्या मंगल धम्माने सर्व विश्वाचे कल्याण साधले जाणार आहे. त्यामुळे बुद्ध जयंती ही प्रत्येक भारतीयाने शील आचरणाने साजरी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आदमाने, तनिष्क वानखेडे, संदीप सोनवणे यांना अंशकालीन श्रामनेर दीक्षा भंन्ते पय्यानंद यांच्या मंगलवाणी आणि आशीर्वादाने देण्यात आली.

यावेळी डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. देवदत्त सावंत, जी.एस.साबळे, पांडुरंग अंबुलगेकर, प्रा.अनिरुद्ध बनसोडे, पंडित सूर्यवंशी, गणपत कदम, उपासक उपासिका यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी परमेश्वर आदमाने, सतीश म्हस्के, समाधान आचार्य व अविनाश आदमाने यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Tathagata Gautam Buddha Jayanti celebration at Mahavihar Satkarni Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.