स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरात दुप्पट वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:12+5:302021-08-20T04:25:12+5:30

मसाल्यांचा दररोजच्या आहारात समावेश आहे. त्यातच कोरोनामुळे पौष्टीक आहाराला नागरिकांची पसंती आहे. काही दिवसांपूर्वी ८०० रुपयांवर असणारी रामपत्री १ ...

The taste of cooking is expensive; Masala prices double! | स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरात दुप्पट वाढ !

स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरात दुप्पट वाढ !

मसाल्यांचा दररोजच्या आहारात समावेश आहे. त्यातच कोरोनामुळे पौष्टीक आहाराला नागरिकांची पसंती आहे. काही दिवसांपूर्वी ८०० रुपयांवर असणारी रामपत्री १ हजार रुपये किलोवर पोहोचली आहे. सोबतच १ हजार ५०० किलो असणारे कर्णफूल २ हजार, लवंग ७८०, काळे मिरे ५२०, नाकेश्वर २ हजार ५००, जायपत्री २ हजार, तमालपत्र १०० रुपये तर १ हजार ५०० रुपयांवर असणारी खसखस २ हजार २०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असल्याचे चित्र आहे.

असे वाढले दर...

मसाला पुूवी आता

रामपत्री ८०० १०००

कर्णफूल १५०० २०००

लवंग ४८० ७८०

काळे मिरे ४८० ५२०

नाकेश्वरी २००० २५००

म्हणून वाढले मसाल्याचे दर...

कोरोनामुळे पौष्टिक आणि सकस आहाराला नागरिकांची पसंती आहे. त्यामुळे मसाल्याला मागणी वाढली आहे. सद्यस्थितीत दरात वाढ झाली असली तरी खरेदीला पसंती आहे. - प्रकाश पोकरणा, व्यापारी.

प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. सध्या पावसाळा आहे, त्यामुळे मसाल्याला मागणी आहे. आवकही काही प्रमाणात कमी झालेली असल्याने दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. - गंगाराम पळसकर, व्यापारी

महागाई पाठ सोडेना...

गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. महागाईमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवाढ कमी केल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल; मात्र याबाबात कोणताही निर्णय होत नाही. - सारिका तत्तापुरे, गृहिणी.

कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनाबरोबरच मसाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा सामना करावा लागत आहे. शासनाने इंधन आणि मसाल्याचे दर कमी करण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. - अनिता करकनाळे, गृहिणी.

Web Title: The taste of cooking is expensive; Masala prices double!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.