उद्दिष्ट २० लाख; लसीकरण झाले साडेचार लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:14+5:302021-07-02T04:14:14+5:30
२० लाख ५६ हजार ८३ लाभार्थ्यांपैकी ५५ टक्के पुरुष तर ४५ टक्के महिलांचा समावेश आहे. या उद्दिष्टातील एकही व्यक्ती ...

उद्दिष्ट २० लाख; लसीकरण झाले साडेचार लाख !
२० लाख ५६ हजार ८३ लाभार्थ्यांपैकी ५५ टक्के पुरुष तर ४५ टक्के महिलांचा समावेश आहे. या उद्दिष्टातील एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये, यादृष्टीने आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि काही उपकेंद्रांतही लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मनपा हद्दीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि मनपाच्या काही केंद्रांवर लस दिली जात आहे. शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नियोजन केले आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
तालुका पहिला डोस दुसरा डोस
अहमदपूर ३०५०८ ७१२०
औसा ३८३३९ ६०६७
चाकूर २७६२१ ६६७५
देवणी १३४१६ ३४८६
जळकोट १४९३४ ४२९८
लातूर ५९९९४ १४५६७
निलंगा ४३५९८ ८६०४
रेणापूर २७३७६ ६०४४
शिरूर अ. १३५२ ३२६८
उदगीर २९६५१ ६९६८
उद्दिष्ट २०,५६,८३
साध्य ५,४३,८५१
लसीचा मागणीनुसार पुरवठा
लसीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने लसीकरण करता येत नाही. १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण झाल्यापासून पुन्हा लसीचा तुटवडा जाणवत आहे. दररोज २५ हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे आहे. मात्र, पुरवठा होत नसल्यामुळे दहा हजार डोसही दररोज देता येत नाहीत, अशी स्थिती आहे. मागणीनुसार पुरवठा व्हावा, अशी मागणी आरोग्य यंत्रणेची असली तरी शासनाकडून तो होत नाही. दरम्यान, गुरुवारी दहा हजार लसीचे डोस मिळाले असून, त्यानुसार लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.