शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद

By हरी मोकाशे | Updated: December 5, 2024 18:36 IST

पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले.

लातूर : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही गावांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ही दोन्ही गावे स्मार्ट ठरल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही गावात आनंद व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत सन २०२२- २३ मध्ये तालुकास्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यातील १० गावांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. यात स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान अशा पाच मुलभूत निकषांप्रमाणे भेटी देऊन कामांची आणि अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही गावांचे निकालाकडे लक्ष लागून होते.

समान गुण मिळाल्याने दोन्ही गावे प्रथम...आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत शेलदरा (ता. जळकोट), बामणी (ता. उदगीर), आंबेगाव (ता. देवणी), गणेशवाडी (ता. शिरुर अनंतपाळ), काटेजवळगा (ता. निलंगा), तांबरवाडी (ता. औसा), सिकंदरपूर (ता. लातूर), पोहरेगाव (ता. रेणापूर), तिवघाळ (ता. चाकूर) आणि सताळा (ता. अहमदपूर) या दहा गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले. त्यामुळे या दोन्ही गावांची संयुक्तरिक्त्या जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून निवड झाली आहे.

प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस...आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका पातळीवर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावास ३० लाखांचे पारितोषिक दिले जाते. त्यानुसार तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांना प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

दोन्ही गावांचे उत्कृष्ट कार्य...स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करीत तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे समान गुण मिळाले. परिणामी, संयुक्तरित्या दोन्ही गावे जिल्हास्तरावर प्रथम आली आहेत. जिल्ह्यातील इतर गावांनीही अशा पध्दतीने गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा.- बाळासाहेब वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद