शिरूर अनंतपाळ ग्रंथालय संघाची तालुकास्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST2020-12-29T04:18:53+5:302020-12-29T04:18:53+5:30
ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष एल. बी. आवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तालुक्यात ४१ अनुदानित वाचनालये असून, यापैकी सर्वच वाचनालयांना ...

शिरूर अनंतपाळ ग्रंथालय संघाची तालुकास्तरीय बैठक
ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष एल. बी. आवाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तालुक्यात ४१ अनुदानित वाचनालये असून, यापैकी सर्वच वाचनालयांना नियमित अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे ग्रंथालये अडचणीत आली आहेत. वेळेवर अनुदान देण्यात यावे. अनुदानात तिप्पट वाढ व्हावी, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, सेवा शर्ती मिळाव्यात, सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे, यासह विविध विषयांवर चर्चा झाली. शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सन २०१२ पासून वाचनालयांचे सर्व प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे एल. बी. आवाळे यांनी सांगितले. तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांनी तसेच जिल्हा ग्रंथालय संघाकडून देण्यात आलेला एक अशा एकूण चार ग्रंथांची भेट आवाळे यांच्या हस्ते ............................................................... देण्यात आली.
***