शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

फेरफरच्या अंतिम निर्णयासाठी तीन हजाराची घेताना तलाठ्याला अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 14, 2023 21:19 IST

निलंगा येथे एसीबीच्या पथकाची कारवाई

राजकुमार जोंधळे / लातूर : जिल्ह्यातील राठोडा येथील शेतीच्या फेरफरप्रकरणी ऑनलाइन आक्षेप नोंदवून घेत, अंतिम निर्णय देण्याच्या कामासाठी सहा हजाराच्या लाचेची मागणी करून तीन हजाराची लाच स्विकारताना केळगावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी निलंगा येथे रंगेहात पकडले. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

एसीबीच्या सूत्रांनी सांगितले, ६७ वर्षीय तक्रारदारासह पुतण्याच्या ताब्यात राठोडा (ता.निलंगा) येथील शिवारात ८० आर कुळाची जमीन आहे. या जमिनीच्या अनुषंगाने बक्षीसपत्राच्या आधारे विरोधी पक्षाने फेरफार नोंदविण्यासाठी केळगावच्या तलाठ्याकडे अर्ज सादर केला होता. दरम्यान, यातील तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने या अर्जावर आक्षेप नोंदविण्यासाठी तलाठ्याकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीला तलाठी कार्यालयात ऑनलाइन नोंदवून तक्रारदाराच्या बाजूने अंतिम निर्णय देण्याच्या कामात मदत करण्यासाठी केळगावचे तलाठी भिमराव निलाप्पा चव्हाण (वय ४७) याने तक्रारदाराला पंचासमक्ष प्रारंभी सहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच देण्या-घेण्याचे ठरले. 

याबाबत ६७ वर्षीय तक्रारदाराने मंगळवारी लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार  केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर निलंगा येथे बुधवारी दुपारी तलाठी कार्यालयात पथकाने सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे काही वेळात तक्रारदार लाच देण्यासाठी आला. त्यावेळी तलाठी चव्हाण याने मागणी केलेली तीन हजाराच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकान रंगेहाथ पकडले.

याबबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लातूर येथील एसीबीचे उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली करत आहेत.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणlaturलातूर