शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी टाकेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:27+5:302021-06-02T04:16:27+5:30
लिंगायत महासंघाच्यावतीने होळकर जयंती साजरी लातूर : लिंगायत महासंघाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महासंघाचे प्रांताध्यक्ष ...

शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी टाकेकर
लिंगायत महासंघाच्यावतीने होळकर जयंती साजरी
लातूर : लिंगायत महासंघाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. काशिनाथ राजे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पदोन्नतीतील आरक्षण ओबीसींना देण्याची मागणी
लातूर : पदोन्नतीतील आरक्षण ओबीसी प्रवर्गाला देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीतून आरक्षण मिळते. ओबीसींना मिळत नाही, ते देण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विजयकुमार पिनाटे, राजेंद्र गिरी, लक्ष्मण दावणकर, भारत काळे, हिरालाल पाटील, रेखा सुडे यांनी म्हटले आहे.
सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता देण्याची मागणी
लातूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने लातूर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक डीसीपीएसधारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा थकीत पहिला हप्ता देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर मच्छिंद्र गुरमे, वनिता काळे, सुरेखा बस्तापुरे, तोळण देशमुख, सुनंदा बालवाड, वर्षा मुस्कावाड, मनोज भिसे, विश्वनाथ खंदाडे, दयानंद बानापुरे, पद्माकर आयनाले, अजित लांजिले आदींची नावे आहेत. आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पालात राहणाऱ्या नागरिकांना अन्नधान्याचे किट
लातूर : रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या नागरिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पाखरसांगवी रोडवर वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार कपिल पवार, मंडळ अधिकारी नागनाथ खंदाडे, तलाठी सागावे, रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव, सचिव किशोर गायकवाड, भुतडा, जोशी समाज समितीचे प्रमुख सल्लागार सचिन भोसले, बसवंत भोळे, काकासाहेब चौगुले, प्रा. अर्जुन भोळे, भागवत गरड, मारोती गरड, संजय दुरवे, अश्रुबा भोळे, कृष्णा भगाडे, विष्णू चौगुले, अण्णासाहेब भोसले, सटवा मंडकर, मैरावण भोळे, नंदकुमार भोसले आदींची उपस्थिती होती.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
लातूर : लातूर तालुक्यातील गाधवड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच साहेबराव क्षीरसागर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब कदम, समाधान कदम, बाबा महाराज भिसे, व्यंकट काळे, जीवन घोडके, सोमनाथ कसपटे, प्रल्हाद अडसूळ, यादव कसपटे, खंडू पानढवळे, सोमनाथ कसपटे, ज्ञानेश्वर अडसूळ, रमेश कसपटे, विलास कराळे आदींची उपस्थिती होती.
अंबुलगा येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
लातूर : निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. जि.प. उपाध्यक्ष भारतबाई साळुंके यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी चेअरमन दगडू साळुंके, सरपंच सुभाष शिंदे, सुभाष म्हेत्रे, भानुदास व्होरे, गुंडेराव बिराजदार, शाहुराज बिरादार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर रोडे, नरसिंग कुलकर्णी, मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे आदींची उपस्थिती होती.