डेंग्यू, साथराेग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययाेजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:21+5:302021-07-28T04:21:21+5:30
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असतानाच मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यासंदर्भातील माहिती मिळताच पालकमंत्री देशमुख ...

डेंग्यू, साथराेग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययाेजना राबवा
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असतानाच मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यासंदर्भातील माहिती मिळताच पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा प्रशासनासह आराेग्य यंत्रणेशी संपर्क करून डेंग्यूचा प्रसार वाढणार नाही यासाठी युद्धपातळीवर उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत ठिकठिकाणी पाणी थांबून डासांची उत्पत्ती हाेते. त्यातून मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची लागण हाेते. त्यामुळे ज्या गावात, प्रभागात डेंग्यूचा संशयित रुग्ण आहे. तेथे आराेग्य कर्मचाऱ्यांनी जाऊन सर्वेक्षण करावे. आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करून आवश्यक ती माहिती नागरिकांना द्यावी, पाण्याचे साठे रिकामे करणे, अबेटचा वापर करणे, संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविणे याबाबत खबरदारी घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवू नये, गटारी-नाल्यातून पाणी तुंबू नये याची काळजी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगर पालिका प्रशासनाने घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी आराेग्य यंत्रणेने चांगले काम केले आहे. हे काम करीत असताना डेंग्यू व इतर साथराेग राेखण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रबाेधनाची माेहीम राबवावी, असेही निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.