माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:27 IST2020-12-14T17:27:31+5:302020-12-14T17:27:37+5:30
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता.

माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
लातूर - कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या माथाडी कामगारांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, माथाडी मंडळातील सेवेत मुलांना प्राधान्य देण्यात यावे, यासह राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ मार्गी लावाव्यात, या मागणीसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव, दिलीप कांबळे, माणिक पाडोळे, जीवन भालेराव, त्र्यंबक गोडबोले, महादेव धनवे, आत्माराम कांबळे, ज्योतिराम गरड, उद्धव पाडोळे, लक्ष्मण शेळके, सचिन चिकाटे, अमोल कांबळे, दयानंद खंडागळे, धोंडिराम भालेकर, महादेव सोनवणे, रामभाऊ बोयणे, सतीश खंडागळे, बब्रुवान जगताप, बालाजी गायकवाड, महिला अध्यक्षा अरुणाबाई मोरे,शांताबाई धावारे, सुनीताबाई कांबळे, इंदूबाई बनसोडे आदींसह महिला कामगार व माथाडी कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.