स्वामी विवेकानंद ग्रंथालय शास्त्रचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:00+5:302020-12-13T04:34:00+5:30

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत स्वामी ...

Swami Vivekananda Library Shastra Result One Hundred Percent | स्वामी विवेकानंद ग्रंथालय शास्त्रचा निकाल शंभर टक्के

स्वामी विवेकानंद ग्रंथालय शास्त्रचा निकाल शंभर टक्के

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यासक्रमाचा शंभर टक्के लागला आहे. बी.लिब. अभ्यासक्रमात बालाजी बिरादार याने ७९.१२ टक्के गुणांसह प्रथम, माधुरी गायकवाड ही ७४ टक्के गुणांसह द्वितीय, विजयकुमार हलगरे हा ७३ टक्के गुणांसह तृतीय आला. एम.लिब. वर्गातील प्रदीप गायकवाड हा ८३.२५ टक्के गुणांसह प्रथम, सुनील रोडगे हा ८१.१२ टक्के गुणांसह द्वितीय, सुमन राजगुरु ही ८०.८७ टक्के गुणांसह तृतीय आली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. सुधीर जगताप, शैक्षणिक संचालक प्रा. संजय हट्टे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, कृष्णा गठ्ठडे, उपप्राचार्य डाॅ. भीमाशंकर कोडगे, प्रा. अमर तांदळे, प्रा. उषा गायकवाड, प्रा. शकुंतला सोनकांबळे, अमोल भाटकुळे आदींनी केले.

Web Title: Swami Vivekananda Library Shastra Result One Hundred Percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.