मद्यपी वाहनचालक सुसाट, पोलिसांकडून कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:56+5:302021-07-04T04:14:56+5:30
लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने वेळोवेळी ब्रिथ ॲनालायझरचा वापर करून मोहीम राबविली जाते. यामध्ये सर्वाधिक कारवाया डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या ...

मद्यपी वाहनचालक सुसाट, पोलिसांकडून कारवाईचा बडगा
लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने वेळोवेळी ब्रिथ ॲनालायझरचा वापर करून मोहीम राबविली जाते. यामध्ये सर्वाधिक कारवाया डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वाधिक कमी कारवाया झाल्या आहेत. यात फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात शून्य कारवाई झाली आहे. आता ही मोहीम पुन्हा हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेला सक्रिय केले जाईल. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर.
ब्रिथ ॲनालायझर मशीनचा वापर...
रस्ते अपघात रोखण्यासाठी ब्रिथ ॲनालायझर मशीनचा वापर महत्वपूर्ण ठरला आहे. महामार्गावर अथवा शहरातील मार्गावर वाहनधारक मद्यप्राशन केला आहे किंवा नाही, याची माहिती पोलीस प्रशासनाला ब्रिथ ॲनालायझर मशीनच्या तपासणीमध्ये मिळते. यातून संबंधित वाहनधारकांवर कारवाई केली जाते.