शिऊर ग्रामस्थांतर्फे सूर्यवंशी यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:59+5:302021-06-17T04:14:59+5:30
... अंधोरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या ...

शिऊर ग्रामस्थांतर्फे सूर्यवंशी यांचा सत्कार
...
अंधोरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या हस्ते पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप चौकटे, ग्रामपंचायत सदस्य यशोदा कांबळे, अहिल्याताई चिल्लेवार, रत्नाकर उदगिरे, पोलीस पाटील नरवाड, बापूराव देवळकर, गोविंद कांबळे, त्रिमुख बने, उमाकांत डिगे, ा्श्यामकांत उदगिरे, संजीव कांबळे आदी उपस्थित होते.
...
वन्य पक्ष्यांचे संरक्षण करण्याची मागणी
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी, ढाळेगाव, गुट्टेवाडी, चिखली, येलदरी परिसरात तितर या पक्ष्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, काही जण या पक्ष्यांची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी काही जण सकाळपासून सायंकाळपर्यंत जाळी लावून बसत आहेत. या पक्षांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी बाबुराव कल्याणे, सदाशिव कराड, कासले, सोमेश्वर डंबाळे, सावंत आदींनी केली आहे.