मराठा सेवा संघातर्फे उपजिल्हा रुग्णालयास सर्जिकल साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:10+5:302021-05-12T04:20:10+5:30
यावेळी तहसीलदार गणेश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. दिलीप सौंदाळे, डॉ. प्रल्हाद सोळुंके, डॉ. हुग्गे, डॉ. बंडगर, डॉ. गीते, ...

मराठा सेवा संघातर्फे उपजिल्हा रुग्णालयास सर्जिकल साहित्य
यावेळी तहसीलदार गणेश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. दिलीप सौंदाळे, डॉ. प्रल्हाद सोळुंके, डॉ. हुग्गे, डॉ. बंडगर, डॉ. गीते, डॉ. मदणे, भाग्यश्री काळे आदी उपस्थित होते. २ लाख ४० हजारांतून ऑक्सिजन फ्लोअर मीटर- ४०, फिंगर ऑक्सिमीटर - ३०, मेडिसन ट्राॅली- ५, जम्बो ऑक्सिजन ट्रॉली - २५, डिस्पोजिबल ऑक्सिजन नळी १०, डिस्पोजिबल मास्क १००, वुडन टेबल १ आदी सर्जिकल साहित्य वैद्यकीय अधीक्षकांकडे देण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. हंसराज भोसले, माजी प्राचार्य दिलीप धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्ष एम. एम. जाधव, विनोद सोनवणे, डी. एस. धुमाळ, संतोष बरमदे, अरुण पाटील, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, संजय इंगळे उपस्थित होते. सेवा संघाच्या १४५ सदस्यांनी या निधीसाठी सहभाग नोंदविला. याबद्दल सेवा संघातर्फे सचिव आर. के. नेलवाडे यांनी सर्वांचे आभार मानले.