रमाबाई अन्नसेवा योजनेचा गरजूंना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:11+5:302021-05-25T04:22:11+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले. त्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण, नातेवाईक आणि ...

रमाबाई अन्नसेवा योजनेचा गरजूंना आधार
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे मुश्कील झाले. त्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण, नातेवाईक आणि गरजूंसाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे रमाबाई अन्नसेवा योजना सुरू करण्यात आली. या उपक्रमासाठी युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे, इंद्रजित बैकरे, प्रवीण केंद्रे, महेश टीळे, सूरज राऊत, हरिभाऊ गायकवाड, प्रमोद गायकवाड, विकास गायकवाड, रॉकी सरवदे, दिग्विजय गोडबोले, प्रशांत कोथिंबीरे, नीलेश मांदळे, राज पारी, सारिका राहुल गायकवाड, प्रा. डॉ. रोहित गायकवाड, एस.आर. बनसोडे आदींनी आर्थिक साहाय्य केले आहे. यशस्वीतेसाठी विजय लांडगे, भैया वाघमारे, विशाल कोथिंबिरे, अक्षय धावरे, सुनील घोडके, क्षितीज कांबळे, बाबा कांबळे, बंटी गायकवाड, सूरज ढगे, प्रतीक वाघमारे, केदार कोथिंबीरे, ऋषी जाधव, समाधान घोडके, समीर लातूरकर, मयूर कदम, जयमाला गायकवाड, डॉ. रोहित गायकवाड, निकिता गायकवाड, वैशालीताई लोंढे, रवी भालेराव, लखन सुरवसे, रवी सुरवसे आदी परिश्रम घेत आहेत.