सुनेगाव - शेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST2021-07-27T04:20:39+5:302021-07-27T04:20:39+5:30

गावात काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. पावसामुळे कचरा भिजून दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांची उत्पत्ती वाढत आहे. ...

Sunegaon - Cleaning campaign on behalf of Shendri Gram Panchayat | सुनेगाव - शेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम

सुनेगाव - शेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम

गावात काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. पावसामुळे कचरा भिजून दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांची उत्पत्ती वाढत आहे. परिणामी, रोगराई होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवसांपासून सफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. गावातील सर्व मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवरील घाण, कचरा उचलण्यात येत आहे. तसेच गटारींचीही सफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबणार नाही. दरम्यान, गावातील नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत स्वत:हून पुढाकार घेतला आहे. राम जायभाये आणि गोपीनाथ जायभाये यांनी स्वतःचे ट्रॅक्टर आणि जेसीबी गावात आणून सफाईसाठी मदत केली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद असल्याने या परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले होते. तिथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी...

गावातील नाल्या, गटारी तुंबून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या स्वच्छता मोहिमेला ग्रामस्थांनी मदत केली आहे. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा. स्वतःच्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सुनेगाव शेनी, शेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Sunegaon - Cleaning campaign on behalf of Shendri Gram Panchayat