रेणापूर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:07 IST2018-07-18T17:06:27+5:302018-07-18T17:07:38+5:30
तालुक्यातील रामवाडी (ख़) येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

रेणापूर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
रेणापूर (लातूर ) : तालुक्यातील रामवाडी (ख़) येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रकाश नरबा तोकटे (३८, रा़ रामवाडी ख़) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. प्रकाश याने मंगळवारी रात्री उशिरा रामवाडी शिवारातील स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी बळवंत तोकटे हे शेताकडे गेले असता त्यांना हे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
यानंतर बीट अंमलदार सदाशिव हुंडेकरी व रावसाहेब तांदळे यांनी घटनास्थळीस भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रकाश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व भाऊ असे परिवार आहे़ आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.