गुजरातच्या सीम सुरक्षा दलाच्या जवानाची चाकुराच्या प्रशिक्षण केंद्रात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:01 IST2018-11-27T11:58:42+5:302018-11-27T12:01:14+5:30
चाकूर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण दल केंद्रातील एका हत्यारी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे एकच्या सुमारास घडली.

गुजरातच्या सीम सुरक्षा दलाच्या जवानाची चाकुराच्या प्रशिक्षण केंद्रात आत्महत्या
चाकूर (जि लातूर) : चाकूर येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण दल केंद्रातील एका हत्यारी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे एकच्या सुमारास घडली. लिटनरॉय कमलनाथरॉय प्रमाणिक असे मृत जवानाचे नाव आहे.
येथील सीमा सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात सेक्युरेटीसाठी गार्ड असतात. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी गुजरात येथील सीमा सुरक्षा दल कॅम्पमधून एक बटालियन आले होते.त्यात लिटनरॉय प्रमाणिक वय २७ वर्ष (रा छोटो पिंजाररझार पोस्ट गोसाईरहट जि कुछबिहार पश्चिम बंगाल) यांचा समावेश होता.या कॅम्पमध्ये रात्री गस्त घालत असताना, लिटनरॉय प्रमाणिक यांनी स्वतःजवळील हत्याराने गळ्याजवळ गोळी झाडून घेतली. हा जवान जागीच कोसळला. पहाऱ्यावर असलेल्या अन्य जवानांनी लिटनरॉय यास उपचारासाठी कॅम्पमधील रुग्णालयात नेले.
यावेळी डोक्यातून अधिक रक्तस्त्राव झाल्याने जवानाची प्रकृती चिंताजनक झाली. त्याला तत्काळ एका रुग्णवाहिकेतून चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. डॉ.एस.बी. नरवटे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. पोलिस निरिक्षक रामेश्वर तट, पोहेकॉ हणमंत आरदवाड यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. पंचनामा करुन अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसात नोंद करण्यात आली आहे.