आडसाली ऊस लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:45+5:302021-07-10T04:14:45+5:30
आडसाली ऊस लागवड व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा कारखान्याचे ...

आडसाली ऊस लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची
आडसाली ऊस लागवड व्यवस्थापन या विषयावरील ऑनलाइन चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, सिद्धी शुगरचे व्हाॅ. प्रेसिडेंट पी.जी. होनराव, केन जनरल मॅनेजर पी.एल. मिटकर, ऊस विकास अधिकारी वाय.आर. टाळे आदी सहभागी झाले होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील कृषीरत्न संजीव माने यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, सिद्धी शुगरच्या कार्यक्षेत्रात आडसाली ऊस लागवडीचा प्रारंभ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते ऊस उत्पादक शेतकरी शरण चवंडा यांच्या शेतात ऊस रोपे लागवड करून करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, शिवसांव चवंडा, माधव माने, नामदेव सुरकुटे, संतोष कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या चर्चासत्रातील आडसाली उसाचे फायदे लक्षात घेऊन येथील प्रगतिशील शेतकरी शरण चवंडा यांनी को- ८६०३२ ऊस जातीची रोपे आडसाली ऊस म्हणून लागवड केली. तसेच या भागातील अन्य शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीचे नियोजन केल्याने कारखान्याच्या ऊस विकास विभागांतर्गत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे.