साखरेचा ‘गाेडवा’ कायम, तिळाचे भाव मात्र वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:11 IST2020-12-28T04:11:41+5:302020-12-28T04:11:41+5:30

साखरेचा भाव सध्या ३४ वरुन ३५ वर पोहोचला आहे. मात्र, तिळाचे भाव १०० ते १५० रुपयांच्या घरात आहेत. गृहिणी ...

Sugar 'gadwa' remains, but sesame prices have gone up! | साखरेचा ‘गाेडवा’ कायम, तिळाचे भाव मात्र वधारले !

साखरेचा ‘गाेडवा’ कायम, तिळाचे भाव मात्र वधारले !

साखरेचा भाव सध्या ३४ वरुन ३५ वर पोहोचला आहे. मात्र, तिळाचे भाव १०० ते १५० रुपयांच्या घरात आहेत. गृहिणी आपापल्या घरी मकर संक्रांतीची माेठी तयार करीत आहेत. त्याला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव केली जात आहे. गूळ, साखर आणि तिळाची माेठी उलाढाल सध्या हाेत आहे. गुळाचे प्रतिकिलाेचे दर ३५ ते ६० रुपये आहेत. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या गुळाला माेठी मागणी आहे. हा गुळ प्रतिकिलाे ७५ ते १०० रुपयाला आहे. तीळ मात्र १०० ते १५० रुपयांच्या घरात आहे. एकंदर साखरेचे भाव स्थिर असून, गूळ आणि तिळाचे दर वधारल्याने गृहिणीला मात्र महागाईचा फटका बसत आहे.

मकरसंक्रांत हा महिलांचा महत्त्वाचा सण आहे. यातून नात्याचे बंध अधिक घट्ट हाेतात. दर सणाला महिलांकडून वाणखरेदी माेठ्या प्रमाणावर केली जाते. तीळ, गुळाचे भाव कमी झाले पाहिजेत.

- माधुरी उदगीरकर, गृहिणी

सध्या बाजारपेठेत साखर हाेलसेल प्रतिक्विंटल ३ हजार ३०० रुपये असून, गावरान गुळ प्रतिक्विंटल ४ हजार आहे. तीळ आणि गुळापेक्षा साखरेचे दर मात्र स्थिर आहेत.

- बसवराजप्पा वळसंगे, व्यापारी

तिळाचा भाव

लातूरच्या बाजारपेठेत तिळाचे भाव चांगलेच वधारले आहेत. प्रतिकिलाे १०० ते १५० रुपयांच्या घरात तिळाचे भाव आहेत. मकरसंक्रांतीला तिळाचे महत्त्व आहे. यासाठी तर संक्रांतीला भाववाढ हाेते. यंदाही २० टक्क्यांनी भाववाढ झाली आहे.

गुळाचा भाव

ग्रामीण भागात सध्या गुऱ्हाळ माेठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नवीन गुळ बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल हाेत असून ४० ते ५० रुपये प्रतिकिलाे असा दर आहे.

साखरेचे भाव

लातूरच्या बाजरपेठेते साखर प्रतिक्विंटल ३ हजार ३०० रुपये मिळत असून, हा दर हाेलसेल आहे. किरकाेळ विक्री प्रतिकिलाे ३४ ते ३५ रुपयांनी केली जाते. दिवाळीपासून साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. त्यातून साखरेची गाेडी कायम असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sugar 'gadwa' remains, but sesame prices have gone up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.