रस्त्यात अचानक दुचाकी घसरून अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
By हरी मोकाशे | Updated: April 6, 2023 13:15 IST2023-04-06T13:15:39+5:302023-04-06T13:15:49+5:30
जखमीस उपचारासाठी उदगीरला रवाना केले आहे

रस्त्यात अचानक दुचाकी घसरून अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
देवणी : देवणीहून तळेगावकडे जाताना दुचाकीवरुन पडून एक २८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास घडली.
परमेश्वर वामन सूर्यवंशी (२८, रा. बाेरोळ, ता. देवणी) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील बोरोळ येथील परमेश्वर वामन सूर्यवंशी (२८) व रावसाहेब एकनाथ सूर्यवंशी (४६) हे दोघे गुरुवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास दुचाकीवरुन देवणीहून तळेगावकडे निघाले होते. दरम्यान, दुचाकीवरुन पडून दोघेही जखमी झाले. त्यातील परमेश्वर सूर्यवंशी याच्या डोक्यास व डाव्या डोळ्याजवळ गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
रावसाहेब सूर्यवंशी हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी उदगीरला पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विनायक कांबळे, गणेश पुजारी, संजय सावरगावे हे करीत आहे.