८१ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:32+5:302021-06-16T04:27:32+5:30
ही आहेत लक्षणे काळ्या बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, ...

८१ म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
ही आहेत लक्षणे
काळ्या बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलू लागणे, टाळूला जखम होणे अशी आहेत. लक्षणे दिसताच रुग्णांनी कान, नाक, घसा विभागामध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉ. विनोद कंदाकुरे, डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. रितेश वाधवानी, डॉ. नंदकुमार डोळे, डॉ. प्रदीप खोकले यांनी केले आहे.
१६० इंजेक्शन उपलब्ध
वैद्यकीय विज्ञान संस्थेत १८ रुग्णांना डोळ्याच्या पाठीमागे इंजेक्शन देऊन यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ६ रुग्णांमध्ये बुरशीबाधित डोळा काढून टाकण्यात आला आहे. म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा नियमित पुरवठा होत आहे. आतापर्यंत १३०६ इंजेक्शन वापरण्यात आली असून, सद्यस्थितीत १६० इंजेक्शन उपलब्ध असल्याचेही अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले.