पल्लवी अडसूळे यांचे राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:26+5:302020-12-11T04:46:26+5:30
खा. सुधाकर श्रृंगारे यांचा लातूरात सत्कार लातूर :भारत संचार निगमच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा लातूर शहर ...

पल्लवी अडसूळे यांचे राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यश
खा. सुधाकर श्रृंगारे यांचा लातूरात सत्कार
लातूर :भारत संचार निगमच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा लातूर शहर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संजय सोनकांबळे, शहराध्यक्ष विजयकुमार आवचारे, अनील कबाडे, डिगंबर खरटमोल, संदीप सोनवणे, अर्चनाताई आल्टे, मंगेश वाघमारे, प्रा. लक्ष्मीकांत खरटमोल, किशोर शिंदे यांची उपस्थिती होती.
निवृत्तीवेतन धारकांनी माहिती सादर
करावी
लातूर : जिल्हा कोषागार अधिकारी, लातूर अंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी सन २०२०-२१ वर्षामध्ये ज्या निवृत्तीवेतन धारकाचे वार्षिक एकूण २ लाख ५० हजार पेक्षा जास्त निवृत्तीवेतन आहे. अशा निवृत्तीवेतन धारकांनी नवीन पध्दतीने विकल्प निवडून कोषागार कार्यालय लातूर येथे अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. निवृत्तीवेतन धारकांनी आपली माहिती विहीत वेळेत कोषागार कार्यालय, लातूर येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन एस.राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीतदि. १५ डिसेंबर पर्यंत लागू राहील.
या आदेशान्वये शस्त्रे, तलवारी, बंदुका, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नसल्याचे आदेशात म्हंटले आहे.
महा आवास अभियान विभागीय कार्यशाळा
लातूर : महा आवास अभियान अंतर्गत औरंगाबाद विभागातील कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजने अंतर्गत मंजूर असलेली घरकुले महा आवास अभियान दरम्यान शंभर दिवसांच्या आत भौतिकदृष्टया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रलंबित मंजुरी, आधार कार्ड नोंदणी, अभिसरण योजनांतर्गत गॅस कनेक्शन, मनरेगा व बचत गटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
बार्शी रोडवरील पथदिवे सुरु करण्याची मागणी
लातूर : शहरातील बार्शी रोडवरील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह पादचारी नागरीकांची गैरसाेय होत आहे. मनपाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. बार्शी रोडवरील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन या मार्गावर रात्री अंधार पसरत आहे. त्यामुळे बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याची मागणी नागरीकांमधून होत आहे.