मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:11+5:302021-08-21T04:24:11+5:30

स्वातंत्र्यदिनानिमित्त जाकेरभाई मित्र मंडळाच्या वतीने किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ...

Success is achieved through hard work | मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल करावी

मेहनतीच्या जोरावर यशस्वी वाटचाल करावी

स्वातंत्र्यदिनानिमित्त जाकेरभाई मित्र मंडळाच्या वतीने किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना जाकेरभाई मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र देऊन

गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भारत भदाडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.बी.आर. बोडके, जुनेद अत्तार, हरिचंद्र सोनवणे, ग्रा.पं. सदस्य धम्मानंद कांबळे, शेटीबा श्रुंगारे, श्रीमंत कांबळे, धनराज बोडके उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी, तर प्रास्ताविक जाकेर कुरेशी यांनी केले. यशस्वितेसाठी अखिल शेख, आसिफ देशमुख, असमत शेख, इम्रान कुरेशी, उमर पठाण आदींनी परिश्रम घेतले. आभार जाकेर कुरेशी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.

Web Title: Success is achieved through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.