महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:17+5:302021-07-11T04:15:17+5:30

लातूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, त्यांना मानाचे स्थान ...

Submit a proposal to take advantage of the Corporation's scheme | महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करा

महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करा

लातूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, त्यांना मानाचे स्थान मिळावे, यासाठी शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळात चालू आर्थिक वर्षासाठी २०२१-२२ अनुदान योजनेचे भौतिक उद्दिष्ट १२५ आणि बीजभांडवल योजनेंतर्गत भौतिक उद्दिष्टे ५० आहे. त्याची कार्यवाही सुुरु करण्यात आली आहे.

महामंडळातर्फे मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मांग, मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्षादरम्यान असावे, निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान आणि अनुभव असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी ग्रामीण, शहरी भागातील उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे, कुटुंबातील पती, पत्नी या दोघांपैकी एकालाच योजनेचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग, तळमजला शिवनेरी गेटसमोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊड, लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

कर्ज प्रकरणासाठी सादर करावयाच्या प्रस्तावासाेबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल - कोटेशन, नमुना ८ अ, जागेचा पुरावा आणि अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला, आदी कागदपत्रं जाेडण्याची गरज आहे.

Web Title: Submit a proposal to take advantage of the Corporation's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.