एसटीची रातराणी रिकामी; ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:59+5:302021-07-14T04:22:59+5:30
लातूर एसटीकडे सहा स्लीपर महामंडळाच्या लातूर विभागाकडे सहा स्लीपर आहेत. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि जळगाव या मार्गावर त्या धावतात. ...

एसटीची रातराणी रिकामी; ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल !
लातूर एसटीकडे सहा स्लीपर
महामंडळाच्या लातूर विभागाकडे सहा स्लीपर आहेत. नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि जळगाव या मार्गावर त्या धावतात. जळगाव, नागपूर वगळता इतर मार्गांवर स्लीपर बससेवेला प्रवाशांतून प्रतिसाद आहे.
लातूर विभागातून नागपूर १, पुणे २, कोल्हापूर १, जळगाव १ आणि इतर ठिकाणी १ अशा सहा स्लीपरचे नियोजन लातूर विभागातून करण्यात आले आहे.
एसटीपेक्षा कमी तिकीट
एसटी महामंडळाच्या बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्सचालक प्रवाशांकडून कमी तिकीट घेतात. तिकिटामध्ये जवळपास शंभर ते दीडशे रुपयांची तफावत आहे. ग्रामीण भागातील प्रवासी पैसे वाचतात म्हणून खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांगांना सवलत असल्याने ते मात्र एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.
स्वच्छ, आरामदायी प्रवास म्हणून प्राधान्य
खासगी ट्रॅव्हल्सकडून स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्या तुलनेत एसटी बसमध्ये स्वच्छता दिसून येत नाही. शिवाय, आसनव्यवस्था उत्तम आणि आरामदायी प्रवास घडत असल्याने अनेक खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते.
- ज्ञानेश्वर जाधव
एसटीकडून सुरक्षित प्रवासाची हमी आहे. शिवाय वेळेचे बंधन आहे. यासाठी ट्रॅव्हल्सपेक्षा मला एसटीचा प्रवास महत्त्वाचा वाटतो. ठरलेल्या वेळेला मार्गस्थ होणे आणि शेवटच्या थांब्यावर वेळेवर पोहोचणे प्रवासासाठी महत्त्वाचे आहे. - आनंद गायकवाड