शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई; ५९ विद्युत पंप, ६१ स्टार्टर जप्त

By हणमंत गायकवाड | Updated: May 24, 2024 20:06 IST

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे.

लातूर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांची पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५९ विद्युत पंप, १६१ स्टार्टर्स, १२३ बंडल वायर आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच ८७६ वीजजोडण्या तोडण्यात आल्या  आहेत.

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे. तरीही नागरिकांच्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन तयार करण्यात आला आहे. ०२३८२-२२०२०४  हा या कक्षाचा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा केला जाईल.

मांजरा प्रकल्प ०.३४ टक्के जिवंत साठामांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे. मृत आणि जिवंत मिळून एकूण पाणीसाठा ४७.७३७ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर केला तर सप्टेंबरपर्यंत पुरू शकते.

गाळ काढण्याची मोहिमे गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे मांजरा प्रकल्पात यंदा पाणी वाढण्याची शक्यता सध्या जिल्ह्यातील धरणातून गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळमुक्त धरण हे अभियान राबविले जात आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातीलही गाळ काढण्याची मोहीम आहे. आतापर्यंत १.६५ लाख घनमीटर गाळ या प्रकल्पातील काढण्यात आला असल्याची माहिती शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली. दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना हा गाळ अनुदानावर देण्याची मोहीम आहे. ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी अनुदान गाळ टाकल्यानंतर आहे. वाहतुकीचा खर्च निघावा, असा हेतू यामागे आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातून काढलेला गाळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेऊन गेला आहे. धरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे दुप्पट सुपिकता वाढते. त्यामुळे गाळ घेऊन जाण्याला परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. मांजरा प्रकल्पाकडे ज्या शेतकऱ्यांनी गाळ नेला आहे, त्या शेतकऱ्यांचा शेती गट नंबर तसेच किती गाळ नेला, याची नोंद आहे. त्यानुसार शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो, अशीही माहिती शाखाधिकाऱ्यांनी दिली.

मांजरा प्रकल्पात मोठा गाळमांजरा प्रकल्पात १६.२२७ दलघमी गाळ साठला आहे. त्यामुळे ८.४१२ टक्के संचयी पाण्याचे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी सध्या गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळामुळे जमिनीचा पोत सुधारतो, शिवाय धरणामध्येही पाण्याची साठवण क्षमता वाढते. गेल्या ४१ वर्षांत मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचलेला आहे. हा गाळ काढला तर पाण्याचे नुकसान होणार नाही.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर