कोविडचे उच्चाटन होईपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:37+5:302021-01-17T04:17:37+5:30
पालकमंत्री देशमुख म्हणाले, लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. लवकरच शासकीय यंत्रणा तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्राची मदत घेऊन व्यापक ...

कोविडचे उच्चाटन होईपर्यंत नियमांचे काटेकोरपणे पालन करा : अमित देशमुख
पालकमंत्री देशमुख म्हणाले, लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. लवकरच शासकीय यंत्रणा तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्राची मदत घेऊन व्यापक मोहीम हाती घेण्यात येईल. जोपर्यंत शंभर टक्के जनतेचे लसीकरण होणार नाही, तोपर्यंत सर्वांनी काळजी घेणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे यासारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. महामारीच्या उच्चाटनासाठी केंद्र व राज्य सरकारनी मोठा लढा लढला. लातूर जिल्ह्यातही रुग्णाच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम झाले. ही सेवा पुरविण्यात योगदान देणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासनाचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी ॲड. समद पटेल, पृथ्वीराज सिरसाट, सिकंदर पटेल, डॉ. शिवाजी फुलारी, डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. मारुती कराळे, डॉ. अभिजित यादव, डॉ. गिरीष ठाकूर, डॉ. उदय मोहिते, डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. महादेव बनसोडे, डॉ. अजित नागावकर, डॉ. नीलम देशपांडे, डॉ. मंगला शिंदे, डॉ. अजय ओहोळ, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. मेघराज चावडा, डॉ. बालाजी कोंबडे, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. महेश पाटील, रणजित आचार्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी.एम. थोरात, व्ही. बी. सोनटक्के, व्ही. वाय. आवाळे, बी. आर. काकडे, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. महेश पाटील यांनी केले.