निलंगा येथे दाेन बसवर दगडफेक
By राजकुमार जोंधळे | Updated: February 20, 2024 20:21 IST2024-02-20T20:21:09+5:302024-02-20T20:21:45+5:30
कर्नाटकातील भालकी आगाराच्या बसवर ही दगडफेक करुन काचा फाेडल्याची घटना घडली.

निलंगा येथे दाेन बसवर दगडफेक
राजकुमार जाेंधळे / निलंगा (जि. लातूर) : निलंगा-किल्लारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या निलंगा आगाराच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. तर कर्नाटकातील भालकी आगाराच्या बसवर ही दगडफेक करुन काचा फाेडल्याची घटना घडली.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा आगाराची (एम.एच. २० बी.एल. २५४४) ही बस निलंगा आगारातून किल्लारीकडे निघाली हाेती. दरम्यान, नणंद रोडवर दुपारी ४:३० वाजता अज्ञाताने बसवर दगडफेक करुन काच फाेडली. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात बसचालक अनंत चव्हाण, वाहक भरत काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तर कर्नाटकातील भालकी आगाराची बस लातूरकडून भालकीकडे प्रवासी घेऊन निघाली हाेती. लातूर-बिदर महामार्गावर बसवेश्वर मंगल कार्यालय नजीक दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने या बसवर दगडफेक करून काच फोडली. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची रात्री प्रक्रिया सुरु आहे.