निलंगा येथील जुन्या पोलीस ठाण्यात ठेवलेला मुद्देमाल चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST2021-05-18T04:20:38+5:302021-05-18T04:20:38+5:30

लातूर : निलंगा येथील जुन्या पाेलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातील साहित्याची चोरी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे ...

The stolen goods kept at the old police station at Nilanga | निलंगा येथील जुन्या पोलीस ठाण्यात ठेवलेला मुद्देमाल चोरीला

निलंगा येथील जुन्या पोलीस ठाण्यात ठेवलेला मुद्देमाल चोरीला

लातूर : निलंगा येथील जुन्या पाेलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातील साहित्याची चोरी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करुन आरोपीला अटक केली असून, मुद्देमालही हस्तगत केला आहे. निलंगा शहरातील जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीमधील मुद्देमाल कक्षाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करुन कक्षातील देशी दारुचा एक बॉक्स (४८ बाटल्या) आणि अन्य मुद्देमाल रविवारी दुपारी चोरला. याबाबत बीट अंमलदार नागटिळक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पथक तयार करण्यात आले. पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तपासाची चक्रे गतिमान करुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकबर उर्फ टायगर फत्ते अहमद शेख (रा. काजी गल्ली, निलंगा) याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून चाेरीला गेलेला ऐवज हस्तगत केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.

दरम्यान, निलंगा येथील जुन्या पोलीस ठाण्याच्या इमारतीत योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नवीन पोलीस इमारत परिसराला संरक्षक भिंत बांधण्याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

Web Title: The stolen goods kept at the old police station at Nilanga