कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:24+5:302021-08-24T04:24:24+5:30

कामखेडा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा, दलित वस्तीतील काम इतर ठिकाणी केले, नाली सफाई न करताच रक्कम उचलून घेऊन खर्च करण्यात ...

Statement to District Collector regarding Kamkheda Gram Panchayat malpractice | कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कामखेडा ग्रामपंचायत गैरव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कामखेडा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा, दलित वस्तीतील काम इतर ठिकाणी केले, नाली सफाई न करताच रक्कम उचलून घेऊन खर्च करण्यात आले, नवीन नळ योजनेच्या नावाखाली भरमसाठ अनामत रक्कम पाणी पट्टी गोळा करणे, गावातून जाणाऱ्या वाहतूकदाराकडून अवैध रक्कम गोळा करणे, ग्रामपंचायतीचे बँक खात्यात रक्कमेची चौकशी, ग्रामपंचायतीचे ऑडिट, तसंच फक्त मर्जीतील व्यक्तींनाच शासनाच्या विविध लाभ व विहिरी देणे अशा अनेक संशयास्पद कारभाराबद्धल नागरिकांत संशय बळावल्याने अनेक गैरव्यवहार झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराची सखोल चौकशी करावी असे निवेदनात देण्यात आले आहे. निवेदनावर भुजंगराव पाटील, गोविंद सूर्यवंशी, राजेसाहेब सूर्यवंशी, अंगद पाटील, गोपाळराव सोमवंशी, योगेश सातपुते, सिद्राम जोगदंड, भीमराव औसेकर, नागनाथ धावने, नागनाथ कसमळे, लहु सोमवंशीसह शंभर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Statement to District Collector regarding Kamkheda Gram Panchayat malpractice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.