रेणापुरात राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:57+5:302021-02-14T04:18:57+5:30
रेणा कारखान्याचे संचालक क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रेमनाथ अकनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेणापूर शहराचे उपनगराध्यक्ष अभिषेक ...

रेणापुरात राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा
रेणा कारखान्याचे संचालक क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष
प्रेमनाथ अकनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेणापूर शहराचे उपनगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रमाकांत वाघमारे, पोलीस संघाचे कर्णधार सतीश लोभे, श्रीराम विद्यालयाचे पर्यवेक्षक सतीश गोडभरले, माजी सरपंच विठ्ठल कटके यांची उपस्थिती होती.
रेणापूरसारख्या ग्रामीण भागात गेल्या ४६ वर्षांपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन
करण्यात येते. या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून संघ सहभागी होतात. यंदाच्या स्पर्धेत २२ संघांनी सहभाग नोदविला आहे. शनिवारी या स्पर्धेचे जय हनुमान क्रीडा मंडळ रेणापूर आणि लायक क्रीडा मंडळ खरोळा यांच्यामध्ये पहिला सामना खेळवून प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेस शंकरराव बुड्डे, शिवाजी कोंडणगिरे, दीपक हिंगणे, लालबा कावळे, दीपक हिंगणे, लक्ष्मण वेल्लाळे, अनिल मांडवकर यांची पंच म्हणून उपस्थिती हाेती. यावेळी प्रभात क्रीडा मंडळ रेणापूरच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या किशोर गट निवड समितीवर सदस्य म्हणून निवड झालेले श्रीराम विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक भातीकरे, पोलीस संघाचे जांभळे आणि प्रभात क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठल औसेकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू रविकांत अकनगीरे, भारत इगे, अंगद कोतवाड, हनमंत कोतवाड, गंगाधर अकनगिरे, सुरज अकनगिरे, अंकुश मोटेगावकर, अनिल राऊत, आशिष येलाले यांच्यासह प्रभात क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.